सर्व साधारण गटातील शिवम पॅनलचे आठही उमेदवार विजयी…!

देवगड : देवगड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रणी दि देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. देवगड या बँकेची पंचवार्षिक निवडणूकित भाजप राष्ट्रवादी प्रणित शिवम पॅनल विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस प्रणित सहकार समृद्धी पॅनल यांच्यात लढत झाली. आज मतमोजणी नंतर सर्वसाधारण गटातून शिवम पॅनेलचे सर्व ८ उमेदवार विजयी झाल्याचे चित्र स्पष्ट होताच, प्रधान कार्यालयाबाहेर निकाल ऐकण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.

या निवडणुकीत शिवम पॅनल सर्वसाधारण गट (देवगड तालुका) सदाशिव ओगले, (१९४५) प्रकाश राणे, ( १८०८) अभय बापट ( १९४३) ), अँड अभिषेक गोगटे, ( १९३६) डॉ.अमोल तेली, ( १८४३) दिनेश घाटे, ( २०७२) समीर पेडणेकर (१९३१) हे शिवम पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी ठरले आहेत. तर सहकार समृद्धी पॅनल मधून सर्वसाधारण गटातून उल्हास मणचेकर (११५४), अब्दूलरशीद अली खान (९९७), संतोष तारी (११३१), किरण टेंबुलकर (१०२७), रघुवीर वायंगणकर (९५७), हे पराभूत झाले आहेत.

यात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार घाटे यांचे सुपुत्र दिनेश घाटे व भाजपाचे माजी आमदार अँड अजित गोगटे यांचे सुपुत्र अँड अभिषेक गोगटे निवडून आले आहेत. गेली कित्येक वर्षे घाटे गोगटे यांनी देवगड अर्बन बँकेची धुरा संभाळली होती. आता घाटे गोगटे यांची नवी पिढी देवगड अर्बन बँकेची धुरा कशा पद्धतीने सांभाळतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.