कौतुकास्पद… वेंकटेश हूरकूडेची 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड…!

बीड : बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून खेळणारा आदर्श क्रिकेट अकॅडमीचा तडाखेबाज फलंदाज वेंकटेश चंद्रकांत हूरकूडे याची बडोदा येथे होनाऱ्या 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. या निवडीबद्दल बीड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय भारतभूषण क्षीरसागर, आदर्श क्रिकेट अकॅडमी चे अध्यक्ष अनिल दादा जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख बीड असोसिएशनचे सचिव अमेर सलीम सर, आदर्श क्रिकेट क्लब चे कर्णधार किशोर जगताप, प्रशिक्षक अजहर शेख, असोसिएशनचे सलेक्टर इरफान कुरेशी, राजन साळवी सर, जावेद पाशा सर, मनोज मामा जोगदंड, गोपाल गुरखुदे, संजयतात्या धस, शेख आरिफ, आदर्श क्रिकेट अकॅडमी चे सर्व पालकवर्ग व खेळाडू यांनी व्यंकटेशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.