मळेवाड शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत सुरू…!

सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड येथील मळेवाड पंचक्रोशि हायस्कूल या केंद्रावर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत सुरू असून, आतापर्यंत जवळपास 20 टक्के मतदान झाले आहे. या केंद्रावर एकूण 51 मतदार असून त्यापैकी 11 मतदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. निवडणूक केंद्रप्रमुख म्हणून विजय चव्हाण काम पाहत आहेत.