कुडाळ : सनातन हिंदु धर्म हा हिंदु राष्ट्राचा प्राण आहे. अनादि काळापासून सनातन हिंदु धर्मातील सिद्धांतानुसारच भारताची राज्यव्यवस्था कार्यरत होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज देशात निधर्मीपणाचा (सेक्युलरपणाचा) गवगवा होत आहे; पण या ‘सेक्युलर’ व्यवस्थेतच हिंदुत्वासाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी आज आपल्याला हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. सेक्युलर व्यवस्थेमुळे हिंदु पिढी उध्वस्त होत आहे. धर्म विसरल्यामुळे विविध प्रकारांच्या जिहादांना हिंदू बळी पडत आहेत. हिंदु मुलींचे आयुष्य उध्वस्त होत आहे. भारतात भिती वाटते अस म्हणारा अमीर खान तो बायकोला घेऊन जगात सर्वत्र गेला आणि त्याच्या लक्षात आले की भारतासारखा सुरक्षित देश जगात कोठेच नाही म्हणून तो परत आला.
आज चित्रपटांतून हिंदूंच्या देवदेवतांची विटंबना केली जाते. हे करताना त्यांना भिती वाटत नाही. कारण त्यांना माहिती की हिंदू माझ कुटुंब, माझा व्यवसाय यात गुरफटलेला आहे. त्यांत धर्माभिमानी राहिला नाही. ही स्थिती आपल्याला पालटायची आहे. म्हणून हिंदु राष्ट्रासाठी आवाज बुलंद करायाचा आहे. सभांच्या माध्यमातून जागृत करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज कायदे करत बसले नाहीत, ज्यांनी गायीवर आणि महिलांवर हात टाकला त्यांचे हात कलम केले. तशी व्यवस्था हिंदु राष्ट्रात असेल. अरब देशात कायदे करताना कुराणचा वापर केला जातो, तर ख्रिस्ती देशात बायबलच्या आधारे कायदे बनवले जातात. बहुसंख्येने असलेल्या हिंदूंच्या भारत देशात सनातन हिंदू धर्माचा आदर करून कायदे बनवले गेले पाहिजेत. सेक्युलर व्यवस्थेत हिंदूंवर अन्याय केले जात आहेत.
आज अल्पसंख्यांना वेगळा न्याय आणि हिंदूंना वेगळा न्याय दिला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण ताठ मानेने जगतो आहोत म्हणून तो इतिहास विसरून चालणार नाही. सेक्युलर व्यवस्थेला पर्याय म्हणून हिंदु राष्ट्र स्थापन करावे लागेल. आंतकवाद कसा संपवावा याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केला आहे. या न्यायाने हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. हे करण्यासाठी शिवाजी महाराजांप्रमाणे साधनाही करूया. आलात तर सोबत घेऊन अन्यथा दुर्लक्ष करू; मात्र हिंदु राष्ट्राला विरोध कराल, तर तुम्हाला बाजूला सारून हिंदु राष्ट्र स्थापन करणार आहोत. जोपर्यंत या देशात हिंदु राष्ट्र स्थापन करत नाही, तोपर्यंत सनातनचा एकही साधक स्वस्थ बसणार नाही.





