देवगड आगारातील महिला वाहक श्रद्धा शेडगे यांचे निधन.!

28

देवगड : देवगड आगारातील वाहक श्रद्धा सुहास शेडगे (वय ४०) यांचे २७ ऑक्टोबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात पती, दोन मुली, सासरे, दिर असा परिवार आहे. देवगड एसटी आगारातील चालक सुहास एकनाथ शेडगे यांच्या त्या पत्नी होत.