सावंतवाडी : सिंधुदुर्ग पोलीस दल पोलीस – जनता संवाद, सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत मळगाव इंग्लिश हायस्कूल येथील सुमारे 150 विद्यार्थी मुलगे – मुली यांचेशी आज संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना ‘सायबर सुरक्षा अंतर्गत सोशल मीडिया पासवर्ड सेक्युरिटी डेटा प्रायव्हसी प्रायव्हसी डेटा शेअरिंग आयडेंटिटी हॅकिंग अकाऊंट क्लोनिंग’ यासंदर्भात सुरक्षा व वाढते धोके यावर उपाययोजना, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, गुगल पे, पेटीएम, ऑनलाईन वॉलेट, अर्बन बँक, तनिष्क ज्वेलर्स, विविध शासकीय संस्था, बँका यांच्या नावाने होणारे फ्रॉड त्याचे प्रकार यावर सुरक्षा बाबत उपाय व स्वतःची जबाबदारी, ई-मेल व मेसेजिंग ॲप, ओटीपी फिशिंग लिंक क्लोनिंग ॲप यामधून फसवणूक याबाबत सुरक्षा, डार्क नेट-
ह्युमन ट्राफिकिंग, मनी लाँडरींग, दहशतवादी कारवाया – सतर्कता आपले कर्तव्य व सुरक्षा, व्यसनमुक्ती –
तंबाखू, गांजा, ड्रग्स, अंमली पदार्थ, तस्करी गुन्हेगारी, शरीरावर आणि मनोव्यापारावर परिणाम, देशविघातक कृत्ये, दहशतवाद फंडींग, वाढत्या हृदयविकार आणि स्ट्रोक समस्या, अॅडिक्शनपासून बचाव, धोके व उपाय, खबरदारी
यापासून वाढत्या वयात विचार नियंत्रण, महिला सुरक्षा, पोक्सो व महिलाकरिता कायदेशीर सुरक्षा बाबी, आपले कर्तव्य, मुलींची छेडखानी परिणाम, हार्मोन चेंज दरम्यान वाईट विचारावर कंट्रोल, ध्येयाचे महत्व, व्यायाम, अभ्यास, व्यक्तिमत्व विकास, स्वतःची जबाबदारी, स्वच्छता, कर्तव्य, देशाभिमान, एकात्मता, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) या सर्व विषयांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी विद्यार्थ्यांना सदर माहिती समजावून दिली.


यावेळी महेंद्र अकॅडेमीचे महेंद्र, पोलीस हवलदार श्री. सावळ, महिला समुपदेशक श्रीमती नमिता परब, प्राचार्य मळगाव इंग्लिश हायस्कूल व शिक्षक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे सूचनेप्रमाणे, पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.





