साळशी प्रशालेत म. गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.!

126

देवगड :  महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुंबई येथील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व किशोर लाड हे लाभले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कमिटीचे चेअरमन सत्यवान सावंत, ग्रा. वि. मंडळ संस्था उपाध्यक्ष  प्रभाकर साळसकर, प्रकाश रावले माजी नाईक हे लाभले.
प्रथम अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले व म.गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले.


कार्यक्रमात प्रशालेच्या अनेक विद्यार्थ्यांनी म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यास उजाळा देणारी भाषणे केली. सहाय्यक शिक्षकांमध्ये श्री. भरणकर, श्री. साटम व श्री. मराठे सर यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या कार्याचे स्मरण करणारे विचार व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी आपल्या मनोगतात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा बोध घेऊन त्यांचे विचार व तत्वे प्रत्यक्ष जीवनात अवलंबली पाहिजेत तसेच श्रमदान व स्वच्छता या विषयावर विचार व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे प्रभाकर साळसकर यांनी आपले विचार प्रकट करताना विद्यार्थ्यांच्यां वक्तृत्व गुणाकडे विकासास संधी देण्याविषयी मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात किशोर लाड यांनी प्रशालेच्या प्रगतीविषयी, क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावर सुंदर मार्गदर्शन करुन उपस्थितांची मने जिंकली.
शेवटी इ.10 वी च्या सिध्दमयी साळसकर हिने सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने इ.10 वीच्या सुमन लब्धे हिने सर्वांची मने जिंकली.
शेवटी मुख्य कार्यक्रमांनतर प्रशालेच्या परिसराची स्वच्छता व साफ- सफाई विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली.