ओव्हरलोड कोळसा वाहतूक केल्यास आंदोलन करणार : सुनील गवस

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील वझरे या ठिकाणी वेदांता सेसा गोवा कोक फॅक्टरी असून त्या ठिकाणी पक्का कोळसा बनवण्यासाठी गोव्याच्या दिशेने ओव्हरलोड कोळशाची पावडर फॅक्टरीकडे आणली जाते. सदर मालाची वाहतूक ही २८ टन असून क्षमतेच्या बाहेर म्हणजेच ५० टनाच्या वर मालाची वाहतूक केली जाते.

सदर ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची एकदम दुरावस्था झालेली आहे. तसेच ही कोळसा वाहतूक रात्रीच्या वेळी होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी लोकांना पण याचा बराच त्रास सहन करावा लागत आहे. आठ दिवसात सदरची कोळसा वाहतूक क्षमतेच्या बाहेर केली गेली तर मनसे आरटीओ सिंधुदुर्ग ओरोस यांच्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष सुनील गवस यांनी दिला आहे.