ग्रामविकासात नागरिकांनी हातभार लावणे गरजेचं : अशोक परब

सिधुर्गनगरी : २६ गावाच्या विकासात सामाजिक हित लक्षात ठेवून प्रत्येक नागरिकांनी हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे, सामाजिक जाणीवेतून सहकार्य करणाऱ्या अशा एका सामाजिक कार्यकर्त्याचा दरवर्षी सत्कार करण्याचा मनोदय माजी सैनिक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक उर्फ पप्पा परब यांनी व्यक्त केला.

रानबांबुळी येथील ग्रामपंचायत पटांगणात ध्वजारोहणाचा सोहळा माजी सैनिक अशोक उर्फ पप्पा परब यांच्या हस्ते नूतन सरपंच परशुराम परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सावंत, माजी सरपंच वसंत बांबुळकर, उपसरपंच सतीश बांबुळकर, माजीसरपच चंद्रकांत ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते बबन परब, पोलीस प्रकाश सुतार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवका श्रीमती एस एल लुडबे, शिक्षक, आरोग्य सेवक, सेविका बचत गटाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रिक्षाचालक अजित पारकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपले विचार व्यक्त करताना माझी सैनिक अशोक उर्फ पप्पा परब म्हणाले ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन माझ्यासारख्या एका ग्रामस्थाला, माजी सैनिकाला संधी दिली त्याबद्दल ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सहकारी यांचे अभिनंदन करतो गावाच्या एकजुटीतून गावाचा विकास व्हावा त्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये उपस्थिती दाखविणे आवश्यक आहे, यातून गावाची एकजूट दिसून येते काही महिन्यापूर्वी गावात सातत्याने उपक्रमात सामाजिक सहभाग दर्शवणाऱ्या एका समाजसेवकाचा सत्कार करावा असे विचार येथील पुरोहित सरवटे यांनी व्यक्त केला.

त्यात अजित पारकर यांचे नाव पुढे आले त्या दृष्टीने हा औपचारिक रित्या प्रथमच सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. यापुढे दरवर्षी गावाच्या सामाजिक जडणघडणीत विकासाच्या दृष्टीने सहकार्य करणाऱ्या एका पुरुष आणि महिला सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार केला जावा असे विचारही त्यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सावंत म्हणाले गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून – दाखवलेली एकजूट वाखाडण्याजोगी आहे अशीच एकजूट प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन व अन्य दिनाच्या तसेच सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमात दाखवून गावाची विकासाची दिशा निश्चित करावी.

या एकजुटीतून गावाचा विकास साधावा आपण सर्वांनी यापुढे सहकार्य कराल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त करत सामाजिक संघटनात्मक विचार व्यक्त केले. यावेळी शालेय शिक्षक श्री जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर नूतन सरपंच परशुराम परब यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित ग्रामस्थांना अभिवादन करून एका ज्येष्ठ माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा हा आपला मानस आहे. त्यातून गावाची संघटित रित्या एकजूट करण्याचा आपला प्रयत्न आहे.

गावातील अशा सामाजिक नागरिकांना संधी मिळावी हाच या मागचा उद्देश आहे, प्रजासत्ताक दिन चिरायू हो भारत देशात असलेले कायदे आणि होणारी प्रगती झेंड्याचा आदर प्रत्येकाने ठेवला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर हर, घर घर तिरंगा उपक्रम राबविला त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला अशा उपक्रमातून देश ,राज्य, जिल्हा आणि गाव समृद्ध करण्याचाच माणस असल्याचे त्यांनी सांगत आपला गाव सामाजिक दृष्टीने संघटितपणे समृद्ध करूया असे विचार व्यक्त केले यानंतर उपस्थीतांचे आभार मानण्यात आले.