एकत्रितपणे प्रचार यंत्रणा राबविल्यामुळे मतदारांमध्ये चांगला संदेश…!

वेंगुर्लेत कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना – महाराष्ट्र शिक्षक परिषद – मुख्याध्यापक संघाचा एकत्रित पणे मतदारांच्या गाठीभेटी

वेंगुर्ला : कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे व विविध संघटनांचा पाठींबा असलेले उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले तालुक्यातील दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पणे शाळांमध्ये जाऊन प्रचाराचा धडाका सुरू ठेवल्यामुळे विरोधी उमेदवाराचा पराभव दिसू लागला आहे. विरोधी उमेदवाराकडे वेंगुर्ले तालुक्यात स्थानिक शिक्षक प्रचारात नसल्याने अलिबाग वरुन कार्यकर्ते आणुन प्रचार करण्याची नामुष्की ओढवली आहे.

आज वेंगुर्ले तालुक्यातील न्यु.इंग्लिश स्कूल – उभादांडा, खर्डेकर महाविद्यालय, वेतोरे हायस्कूल, मातोंड हायस्कूल, जैतीर हायस्कूल – तुळस, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल – रामघाट, अणसुर – पाल हायस्कूल तसेच वेंगुर्ले हायस्कूल इत्यादी शाळा – महाविद्यालयाला भेट देऊन प्रथम पसंतीचे मतदान ज्ञानेश्वर म्हात्रे यांना करावे असे आवाहन केले. त्यांना प्रत्येक शाळेत शिक्षक मतदारांचा उस्फुर्त पणे प्रतीसाद मिळत आहे.

आजच्या प्रचार फेरीत भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुषमा खानोलकर, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महीला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले, शक्ती केंद्र प्रमुख ताता मेस्त्री, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह सलिम तकिलदार, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुरेखा शिंदे मॅडम, तालुका अध्यक्ष कीशोर सोन्सुरकर सर, तालुका उपाध्यक्ष सुनील गंगाराम जाधव सर, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे सर, माजी मुख्याध्यापक एस्.एस्.काळे सर सर सहभागी झाले होते.