देवगड हादरले, मिठबाव येथील युवकाचा खून..! ; मुणगे – मशवी मार्गावर आढळला मृतदेह .!

702

देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे – आचरा महामार्गावर मुणगे मशवी रस्त्यावर मिठबाव येथील एका युवकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला असावा असा अंदाज प्रथमदर्शी पोलीसांनी व्यक्त केला. गाडीच्या पुढील दरवाजा उघडलेला अवस्थेत असून काचेवर बोनेटवर दरवाजावर अवघड वस्तूने आघात केल्यासारखे खुणा दिसून येत होत्या.या घटनेची माहिती मिळताच मिठबांव सरपंच भाई नेते व देवगड पोलीस या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसमवेत दाखल झाले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर सावंत, पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम ,राजन जाधव ,प्रसाद आचरेकर ,स्वप्निल भोर ,स्वप्नील ठोंबरे ,यांच्यासह डॉग स्कॉड ,स्कॉड पथक देखील या ठिकाणी दाखल झाले होते. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार प्रसाद हा मिठाबाव येथे महा ई सेवा केंद्र चालवत होता तसेच तो भाड्याने फोर व्हीलर देण्याचा व्यवसाय देखील करत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा फोन आला व त्यांनी आपल्या रुग्णाला कुडाळ येथे घेऊन यायचे असल्याने तुझी गाडी उद्या घेऊन ये असे सांगितले. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या मालकीची व्हॅगनार कार घेऊन भाडे नेण्यासाठी प्रसाद मसवी येथे गेला . मात्र आपण कोणाचे भाडे घेतले आहे अथवा त्याबद्दलची पूर्ण माहिती त्यांनी घरात आई-वडील व पत्नीला दिली नसलेले याबाबत उलगडा अद्यापही होऊ शकलेला नाही.

सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मिठबाव सरपंच भाई नरे यांना मशवी येथे व्हॅगनार गाडीला अपघात झाला आहे व असा फोन आल्यावर ते आपल्या सहकाऱ्यासमवेत गाडी घेऊन त्या ठिकाणी गेले. त्यावेळी मशवी रस्त्यावर व्हॅगनार गाडीचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत त्यांना दिसल.गाडीचा नंबर पाहिला असता गाडी मिठबाब येथील तात्या लोकेंची असल्याचे लक्षात आले .गाडीमध्ये त्यांनी पाहिले असता प्रसाद लोके हा रक्तबंबाळ अवस्थेत उलट्या स्थितीत पडलेला दिसला. त्यांच्या डोक्यावर मागवून धारदार शास्त्राने वार केल्याचे दिसल्यानंतर त्यांनी प्रथम पोलीस देवगड पोलीस स्टेशन यांना माहिती दिली. देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आपल्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी दाखल झाले . घटनास्थळाची पाहणी करून गाडीत उलट्या स्थितीत खून करून टाकलेल्या प्रसाद याचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला. प्रसादच्या डोक्यावर अंगावर धारदार शासनाने वार करून त्याचा निर्घृणपणे खूण केल्याने रीतसर पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड येथे नेण्यात आला. प्रसाद हा मनमिळाऊ स्वरूपाचा शांत मुलगा होता मात्र त्याच्या निर्घृणपणे खूण केल्याने मिठबाव सह देवगड तालुका देखील हादरला आहे. या हत्यामागचे नेमके कारण काय ते अद्यापही समजू शकले नाही.