आयनल मणेरवाडीत ‘घरगुती गणपती सजावट स्पर्धा’.! ; कै. भास्कर मसुरकर यांचे स्मरणार्थ आयोजन.

86

कणकवली : तालुक्यातील आयनल मणेरवाडी गावाचे सुपुत्र तथा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कै. भास्कर भगवान मसुरकर यांच्या स्मरणार्थ ‘घरगुती गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 2222/ रुपये रोख व चषक, द्वितीय पारितोषिक 1111/ रुपये रोख व चषक, तृतीय पारितोषिक 555/ रुपये व चषक तर उत्तेजनार्थ पारितोषिक 501 रुपये व चषक असे आहे. तरी आयनल मणेरवाडी तालुका कणकवली येथील गणेश भक्तांनी संपर्क साधावा, असे आयोजक मनोहर भगवान मसुरकर आणि समस्त मसुरकर कुटुंबीयांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मनोहर मसुरकर (मोबाईल क्रमांक ९००४३३८१४३) यावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.