कणकवली : कणकवली तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा सन २०२३ नुकतीच कनेडी हायस्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेवर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेने दरवर्षी प्रमाणे आपले वर्चस्व राखले. सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण १८० पेक्षा जास्त कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेचा गटवार निकाल खालील प्रमाणे –
१४ वर्षाखालील मुले –
ऑस्टीन विनुस डिसोजा (प्रथम – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), आरफात हपिज चौगुले (द्वितीय – नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे ), मिरान अख्तर पटेल ( तृतीय – ल. गो. सामंत विद्यालय हरकुळ बु.), शुभम शिवराम तांबे ( चतुर्थ – माध्यमिक विद्यालय नाटळ), भविष्य विनायक भोगटे (पञ्चम – शंकर महादेव विद्यालय कुंभवडे), पियुष प्रशांत चव्हाण ( षष्ठ – माध्यमिक विद्यालय नाटळ)
१४ वर्षाखालील मुली –
दिव्या नंदकिशोर चव्हाण (प्रथम – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), उत्कर्षा भिकाजी जाधव (द्वितीय – नाथ पै ज्ञानप्रबोधिनी करूळ), कृपा अनिल पेडणेकर (तृतीय – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), तन्वी संतोष कांबळे (चतुर्थ, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), मुक्ती अमृत भातखंडे (पञ्चम – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), आलीझा मुबारक काझी (षष्ठ – नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे)
१७ वर्षाखालील मुले –
सुयश संदेश रणसिंग (प्रथम, विद्यामंदिर प्रशाला कणकवली), जीवन शामा जाधव (द्वितीय – शंकर महादेव विद्यालय कुंभवडे), सार्थक सचिन जैताळकर (तृतीय – विद्यामंदिर प्रशाला कणकवली), तेजस संदीप पवार (चतुर्थ – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), दर्शन विक्रांत ठाकूर (पञ्चम – शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव), लावण्य परशुराम आळवे (षष्ठ – विद्यामंदिर प्रशाला कणकवली)
१७ वर्षाखालील मुली –
श्रेया राजेंद्र महाडिक (प्रथम – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), कृपा सचिन सादये (द्वितीय – एस्. एम्. हायस्कूल कणकवली), जान्हवी रवींद्र मेस्त्री (विद्यामंदिर प्रशाला कणकवली), उत्कर्षा श्रीधर नार्वेकर (चतुर्थ – माध्यमिक विद्यालय नाटळ), परिणिता विजय गावकर (पञ्चम – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), ऋतुजा रवींद्र कदम (शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव)
१९ वर्षाखालील मुले –
ऋषीकेश दिनेश पाटील (प्रथम – एस्. एम्. हायस्कूल कणकवली), वेदांत विनायक वायंगणकर (द्वितीय – ज्युनिअर कॉलेज कासार्डे), संकेत सोमनाथ मोहिते (तृतीय – श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी), साईप्रसाद राजेश पावसकर (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट), गौरव संदीप पवार (पञ्चम – श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी), मकरंद पांडुरंग वाळके (षष्ठ – श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी)
१९ वर्षाखालील मुली –
दिक्षा नंदकिशोर चव्हाण (प्रथम – श्री तुकाराम शिवराम सावंत जुनिअर कॉलेज ऑफ साय,न्स कनेडी), वैष्णवी राजेंद्र तवटे (द्वितीय – कणकवली कॉलेज कणकवली), पायल पांडुरंग मेस्त्री (तृतीय – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), मृदुला संजय गोडे (चतुर्थ – कासार्डे ज्युनिअर कॉलेज), गौरी यशवंत गावडे (पञ्चम – कणकवली कॉलेज कणकवली), ऋतुजा दीपक पेडणेकर (षष्ठ – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी)
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथेच होणार असलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी शालेय समिती चेअरमन आर. एच्. सावंत यांनी केले. प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून प्रशालेचे संस्कृत अध्यापक तसेच राज्यस्तरीय पंच मकरंद आपटे व तालुका कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी गौतम यादव यांनी काम पाहिले. क्रीडा समन्वयक कणकवली तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक बयाजी बुराण यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



