सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त बौद्ध संघटनेची शुक्रवारी सभा..!

31

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेची तिसरी वार्षिक सर्व साधारण सभा शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी इतर अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार असून नवी कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. तरी सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे,  असे आवाहन करण्यात आले आहे.