सावंतवाडी : सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी ‘जागतिक आजी आजोबा दिना’चे औचित्य साधून येथील मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी या प्रशालेमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात श्री. नारायण लक्ष्मण मालवणकर या दांपत्याचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, फादर रिचर्ड सालदान्हा यांनी आपल्या घरात संस्कारांची शिदोरी म्हणजे आजी-आजोबा असतात. त्यांच्या अनुभवातून आपल्याला अनेक मार्ग सापडतात असे सांगितले.





