‘मिलाग्रीस’च्या कबड्डी संघाची जिल्हास्तरावर भरारी..!

74

सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूल या प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरावर अंतिम विजेतेपद पटकावून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
या कबड्डी संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.