कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत भरडधान्य व तृणधान्य यांच्या पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नाचणी, बाजरी, वरी, मका, सावा, तांदूळ तसेच गहू वळगून सर्व तृणधान्यांचे पदार्थ विद्यार्थी व पालक यांनी तयार करून आणले होते. उत्कृष्ट मांडणी, आकर्षक सजावट करून चवदार पदार्थ तयार केले होते. या स्पर्धेचे नियोजन सहाय्यक शिक्षक श्री. नागभिडकर, सौ. केळुसकर, सौ. शिरसाट यांनी केले होते.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून पाककला तज्ज्ञ श्री. टकले सर व रोहण कदम लाभले होते. या स्पर्धेचे उद्गाटन विस्तार अधिकारी श्री. राऊत व केंद्रप्रमुख श्री. मसूरकर यांनी केले. त्यांनी तृणधान्य व भरडधान्य विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक. व्ही. व्ही. जाधव, ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.






