सावंतवाडी : येथील इनरव्हील क्लबच्या वतीने रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी ‘वॉकॅथॉन’ हा ५ किलोमीटर चालणे हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात सहभागी झालेला आठ वर्षाचा ‘कबीर हेरेकर’ हा चिमुकला सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला.
वास्तविक पाहता सदर उपक्रम हा 18 वर्षावरील व्यक्तींसाठी होता. मात्र इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या हाकेला सर्वोत्तम प्रतिसाद दिला तो आठ वर्षाच्या कबीरने. येथील मोती तलावालास तीन राऊंड पूर्ण मारून त्याने पाच किलोमीटरचे अंतर सहज पार पाडले. यावेळी त्याने इतरांना ‘पर्यावरण संवर्ध’न आणि आरोग्यासाठी रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे व चालत राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगून कमी वयात आरोग्याबाबत आपणास किती जागृती आहे, हे दाखवून दिले. खरोखर कबीरसारख्या बालकांची आज देशाला गरज आहे असेच यानिमित्ताने पहावयास मिळाले. दरम्यान, ‘महाराष्ट्र माझा’शी देखील त्याने यावेळी संवाद साधला.





