परतूर : मराठा समाजाच्या मागणीचे अजूनपर्यंत समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याने मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी परतूर तालुक्यातील खडकी गावातील युवकाने आपल्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वत:च्या समाजासाठी आज मराठा युवक जागा झाला असून आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक युवक आपले रक्त सांडायला तयार आहेत. आमच्या भावना लक्षात घेऊन सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असा इशारा चवडे यांनी दिलाय.





