कणकवली : शुक्रवारपासून सुरू झालेल्या संततदार पावसामुळे सुरक्षित असलेला फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर रस्त्यावर, शनिवारी सकाळी १०च्या दरम्यान दरडी कोसळण्यास सुरुवात झाली. दर्डीचे दगड, मलबा, माती रस्त्यावर पसरल्याने वाहतूक अक्षरशः बंद झाली. रस्ता बंद झाल्याचे समजताच नेहमी घाटात हजर असणारे ट्राफिक पोलीस कार्यरत झाले. बांधकाम विभागाला रस्ता बंद झाल्याचे वृत्त समजताच उपकार्यकारी अभियंता प्रभू, अधिकारी अभियंता पवार-कांबळी तसेच कर्मचारी शाहू शेळके, पावसकर, सावंत घटनास्थळी धाव घेऊन जेसीबी द्वारे दरडी हटवून एक मार्ग खुला केला.





