P.I. प्रवीण कोल्हे यांच्याहस्ते घुमडे येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन ; उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत स्पर्धा.

78

मालवण : पवित्र अशा श्रावण मास निमित्ताने श्री देवी घुमडाई मंदिर, घुमडे येथे उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित, गुरुवर्य कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मरणार्थ निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक भाई खोत, बुवा भालचंद्र केळुसकर, गजानन देसाई, सरपंच स्नेहल बिरमोळे, दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, सुधीर वस्त, प्रशांत बिरमोळे, योगेश सामंत आदी प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद सातार्डेकर तर सूत्रसंचलन व आभार भाऊ सामंत यांनी मानले. यावेळी
निहार टेंबुलकर, गणपत बिरमोळे, अंकित बिरमोळे, रवी बिरमोळे, सुभाष गावडे, भूषण गावडे, संकेत बिरमोळे, दत्तात्रय बिरमोळे, आबा बिरमोळे, कुणाल बिरमोळे, मयूर बिरमोळे, सुरज बिरमोळे, सुमित राणे, रामचंद्र सावंत, राजा बिरमोळे, उमेश परब यांचे सहकार्य लाभले.

स्पर्धेतील विजेत्या मंडळास ११,१११ व सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक ७,७७७ सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक ५,५५५ सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र उत्तेजनार्थ प्रथम ३,३३३ सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ द्वितीय २,२२२ सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र कै. रत्नाकर हरी बिरमोळे समारणार्थ वैयक्तिक पारितोषिके
उत्कृष्ट कोरस, तालरक्षक, उत्कृष्ट गायक यांना प्रत्येकी १,१११ व सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेची सर्व बक्षिसे उद्योजक दत्ता सामंत यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहेत. मंगळवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भजन स्पर्धा पारितोषिक सोहळा मंदिरात संपन्न होणार आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने सचिव भाऊ सामंत यांनी दिली.