- सिंधुदुर्गनगरी : तळवडे शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेची 10 सप्टेंबर 2023 ची सर्वसाधारण सभा जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग यांनी पुढील आदेशा येईपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे सचिव यांनी नवीन 98 सभासदांसहित सर्व 208 सदस्यांना सभेसाठी आमंत्रित केले होते. मात्र संस्थेचे पदाधिकारी यांनी नवीन सभासद वगळून फक्त 57 सभासदांना आमंत्रित केले होते. नव्याने 98 सभासद झालेल्या व्यक्तींना सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात हरकत असल्याने बाबतचा वाद निर्माण झाला होता. 98 सभासदांना न्याय देण्यासाठी नारायण जाधव यांनी जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे खटला दाखल केला असता जिल्हा न्यायालय यांनी यांनी 10 सप्टेंबर च्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती आदेश दिला आहे.
तसेच नव्याने झालेल्या 98 सभासदाबाबत पुढील आदेश देईपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश पारित केले आहेत. संस्था सचिव आणि संस्था पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत वैचारिक वादामुळे सदरचा वाद झाले असल्याचे नारायण जाधव यांनी सांगितले. तसेच आपल्याला न्याय मिळेपर्यंत वरिष्ठ स्तरापर्यंत लढत राहणार आहे व येणाऱ्या पुढील काळात संस्थेवरती प्रशासक नेमण्याची मागणी करणार असलेची जाधव यांनी माहिती दिली.





