पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर.!

50

देवगड : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग, यांच्यावतीने देवगड येथील श्रीमती. न. शा. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, येथे बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. सदर कार्यक्रमास मा. डॉ. ज्योत्स्ना पडियार (अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी तथा अध्यक्ष) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग.) यांचे मार्गदर्शन लाभले.

१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, हॉटेल व्यवस्थापन अशा उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी मागासवर्गीय विद्यार्थांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. याबाबत डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी विद्यार्थी व पालकांना जात प्रमाणपत्र पडताळणी करिता येणाऱ्या अडचणी बाबत सहज व सुलभ प्रकारे कसे अर्ज सादर करता येतील याबाबत परिपूर्ण माहिती दिली.

सदर कार्यक्रमास जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे संतोष कदम वअजित गंगावणे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.