महाराष्ट्राच्या एकमेव महिला मंत्री आदिती तटकरे यांनी ‘असे’ साजरा केले रक्षाबंधन..!

459

रायगड : रुपेश रटाटे

सगळीकडे रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात साजरा केला गेला. मात्र राज्याच्या सर्वसमान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे, ‘जन सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य मनाशी धरून रायगड जिल्ह्याच्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळाच ठसा उमटवित, स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या, रायगड जिल्हाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील माजी मंत्री तथा पालक मंत्री म्हणून काम पाहणाऱ्या आणि आत्ताच्या महायुती सरकारमधील पहिल्या महिला मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल रक्षाबंधन या पवित्र नात्याची असलेली पवित्रता जपत रक्षाबंधन साजरी केले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी रोहा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष, लोकप्रिय, साधी राहणीमान, गोरगरीब जनतेच्या मनातील आवाज, म्हणून ज्यांची ओळख आहे असे ग्रामपंचायत धाटावचे माजी सरपंच विनोद पाशीलकर यांच्या राहत्या घरी काल सायंकाळी जाऊन बहीण-भाऊ या नात्याला आणखी बळकटी दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांनी सुद्धा आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा केले आहे. मात्र रक्षाबंधनाचे या भाऊ-बहिणीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.