मालवण : गोकुळाष्टमीचा सण सिंधुदुर्ग जिल्ह्यात धूम धडाक्यात साजरा होत असून, यावर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी 115 दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत. भारतीय जनता पक्षाने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून यानिमित्ताने नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. निवडणुकीचे वर्ष असून दहीहंडीचा विषय विविध राजकीय पक्षाच्या सहभागाने साजरा होणार आहे. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात व भाजपच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी गोकुळाष्टमी व काल्याचा सण धुमधडाक्यात साजरा होत आहे.





