बांदा : बांदा वाफोली मार्गावर गणेश नगर येथे असलेल्या श्री गणेश मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वभक्तगणांना सुख, समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे यासाठी २४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते दु. २ या वेळेत ‘गणेशयाग’ कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे.
बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी माघी गणेश जयंती सोहळा पहाटे आरंभ होईल.या निमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे आहे :
पहाटे ५ वा.काकड आरती, अभिषेक व पूजा.सकाळी ९ वा. श्री सत्यविनायक महापूजा,ठिक
दुपारी १२ वा.गणेश जन्म सोहळा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद
सायंकाळी विविध भजनाचा कार्यक्रम
रात्रौ ९.०० वाजता अष्टविनायक दशावतारी नाट्यमंडळ, निरवडे, ता. सावंतवाडी यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘माहेरवाशिणी आई भवानी’ आदी कार्यक्रम आय़ोजित करण्यात आले आहेत. भाविकांनी या सोङळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिर सेवा समिती, बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.





