हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वाळूशिल्प…!

वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारले…

सिंधुदुर्ग : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी वेंगुर्ले सोनसुरे येथील एक वाळू शिल्पकार रविराज चिपकर याने आरवली सागरतीर्थ किनाऱ्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वाळू शिल्प साकारत अनोखी आगळीवेगळी मानवंदना दिली आहे.

वाळू शिल्पकार रविराज चिपकर हे अनेक सामाजिक विषयावर वाळू शिल्प साकारत असतात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वाळूशिल्प त्यांनी अवघ्या तीन तासात साकारले आहे. या साकारलेल्या वाळू शिल्पामध्ये रंगसंगती देत अतिशय मनमोहक असे हे शिल्प सध्या लक्षवेधी ठरत आहे.