सचिव पदी गजानन नानचे ; जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया बिनविरोध
वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे दोन महामंडळ निर्माण झाली होती. दोन्ही महामंडळाचे एकीकरण सांगली येथे झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा शिक्षकेतर संघटनेचे दोन संघटना निर्माण झाल्या होत्याा. दोन्ही संघटनांना राज्य महामंडळाने एकत्र करून त्या एकत्रिकरणची आज सार्वत्रिक निवडणूक जिल्हा माध्यमिक पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे घेण्यात आली.
या कार्यकारणी मध्ये अनिल राणे अध्यक्ष, धनश्री गावडे उपाध्यक्ष, गोपाळ चौकेकर उपाध्यक्ष, लाडू जाधव उपाध्यक्ष, सुहास देसाई उपाध्यक्ष, गजानन नानचे सचिव, यादवराव ठाकरे सहसचिव, प्रदीप सावंत कार्याध्यक्ष, गोपाळ हरमलकर खजिनदार, वैभव केंकरे राज्य प्रतिनिधी, होमदेव निनावे राज्य प्रतिनिधी सेवक, कैलास घाडीगावकर हिशोब तपासणी, निलेश पारकर संघटक, रवीकमल सावंत संघटक, शर्मिला गावकर महिला प्रतिनिधी, सुधाकर बांदेकर युवा संघटक, तानाजी खोत युवा संघटक, काका मांजरेकर ज्येष्ठ सल्लागार, पांडुरंग दळवी ज्येष्ठ सल्लागार, बळीराम सावंत सदस्य, विनायक पाटकर सदस्य, अनिल कदम सदस्य, रुपेश खोबरेकर सदस्य, राकेश खाजनवाडकर सदस्य, गणेश देसाई सदस्य, गोविंद चिपकर सदस्य या सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून गोवर्धन पांडुळे पुणे विभागीय सचिव महामंडळ महाराष्ट्र राज्य, संजय पाटील निवडणूक निरीक्षक कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, बाबा गडगे महामंडळाचे माजी अध्यक्ष व निवडणूक अधिकारी म्हणून उदय घाटवळ यांनी काम पाहिले.
यावेळी मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गोपाळ हरमलकर, विजय गवस ,शाबी तुळसकर, वैभव कंट्री, गोविंद कानसे, राकेश खाजवाडकर आदींनी परिश्रम घेतले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही संघटनेचे एकीकरण झाले असल्याने शिक्षकेतर कर्मचारी बांधवांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पसरले असून राज्य महामंडळाचे पुढील वर्षीचे राज्य अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातच घेणार असा शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी यावेळी निश्चय केला.





