तळेखोल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश…!

दोडामार्ग : दोडामार्ग तळेखोल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, दशरथ गवस तसेच त्याच्या सहकाऱ्यांनी ठाकरे गटांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्या भागात शिवसेना उभारी घेऊ शकते, आगामी निवडणूकीत हीच मते निर्णायक ठरणार असून गावाच्या विकास कामासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असा विश्वास उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष संजय गवस, उपतालुकाध्यक्ष मिलिंद गवस, विभागप्रमुख कृष्णा पर्येंकर, आयी उपसरपंच भदी गवस, सगुण सावंत, विठू झोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.