उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा..!

56

मुंबई : सध्या राज्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकं वाया जात आहेत. लातूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकड पिकांना देण्यासाठी विहीरीचे पाणी आहे, ते शेतकरी पिकं जगवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. तसेच आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाहीये. यावर फडणवीसांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आणि म्हणाले, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन.