मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अहमदनगर पोलिसांनी अटक केली आहे. शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील बाळकृष्ण ढाकणे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळकृष्ण ढाकणे याने गुरुवारी (31 ऑगस्ट) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास 112 वर फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. तसेच मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असे तो म्हणाला. बाळकृष्ण याने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.





