सावंतवाडी : मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे निवृत्त शिक्षक
मारुती मऱ्याप्पा डुक्करवाडीकर उर्फ मारुती बांदेकर ( ८८, रा. मळगाव, रस्तावाडी, मुळ बेळगाव वडगांव ) यांचे गुरुवारी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने मळगाव येथील राहत्या घरी निधन झाले.
मुंबई ऐक्यवर्धक संघ संचालित मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये १९६९ ते १९९४ शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. तसेच आर एम पी डॉक्टर म्हणून ते वैद्यकीय सेवाही देत असत. कलंबिस्त हायस्कूलचे ते पहिले मुख्याध्यापक होते.
मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी व शारीरीक शिक्षण (सीपीई) चे शिक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमी हसतमुख चेहरा व सर्वांना आपलेसे करणारे शिक्षक म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे मळगाव गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
खेमराज मेमोरियल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक पृथ्वीराज उर्फ राजू बांदेकर व गीता कोंडये यांचे ते वडील तर गणेश चित्रशाळा मूर्तिकार व प्रथमेश रंगपंच मळगावचे संचालक उमेश कोंडये यांचे ते आजोबा होत.





