रिक्षाचालकांमध्ये हाणामारी.!, कणकवलीतील प्रकार ; प्रवासी भरला म्हणून केली मारहाण.

51
कणकवली : कणकवली बसस्थानकावर कलमठ येथील रिक्षा चालकाला रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अन्य रिक्षाचालकांनी मारहाण केली. संबधित रिक्षा चालकाने पोलीस ठाण्यात धाव घेत आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली आहे. दरम्यान याबाबत रीतसर तक्रार देण्यासाठी रिक्षाचालकाने कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.