अवघ्या १२ तासात चोरटा जेरबंद ..! ; ‘एलसीबी’ची धमाकेदार कामगिरी..!

58

सावंतवाडी : तालुक्यातील इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरीत अज्ञात चोरट्याने दुकानाच्या मागील खिडकीचे गज कापून त्यावाटे आत प्रवेश करून 48 हजार रोख व मोबाईल हॅन्डसेट चोरून नेले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचेकडून सदर गुन्ह्यांचा समांतर तपास चालू असतांना घटनास्थळ जवळ मिळून आलेले CCTV फुटेजमध्ये आरोपीने रेनकोट घालून चोरी केल्याचे दिसून आले.

सदर फुटेज व आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा अॅक्टीव्हा पांढ-या रंगाची गाडी यावरुन तपास करत सावंतवाडी सालईवाडा, परीट पाणंद येथून आरोपी नामे कन्हैया मनोरंजन गिरी, वय-33, मुळ रा. डमामी शिवनगर, बेलसंडा, जिल्हा- सितामढी (सितामही) राज्य – बिहार यास सापळा रचून मध्यरात्री 12.30 वाजता त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या पांढन्या रंगाची होंडा अॅक्टीव्हा दुचाकी क्रमांक MH-07 AR-1868 यासह ताव्यात घेतले. तसेच त्याचेकडून आयफोन व डोकोमो गॅलक्सी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्याने केलेला कुडाळ पोलीस ठाणे हृध्दीतील गुन्हा उघडकीस आलेला आहे. आरोपी व त्याचे साथीदारांनी मिळून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये दिवसा किंवा रात्री घरफोडी अजून काही गुन्हे केले आहेत काय? याबाबत सखोल तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, व बांदा पोलीस ठाणे यांचेमार्फत चालू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग संदीप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर, संतोष सावंत, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर, संदीप नार्वेकर यांनी केलेली आहे. बळीराम सुतार, मालवण पोलीस ठाणे यांनी गुन्हा उघड करण्यासाठी तांत्रिक मदत केलेली आहे.