कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाट गावातील गवळदेव येथे नवीन एसटी पिकअप शेड उभारण्यात आली आहे. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पाट येथील गावभेट दौऱ्यादरम्यान या एसटी पिकअप शेडचे लोकार्पण करण्यात आले. पाट गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील सर्वोतपरी सहकार्य केले जाईल असे वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. पाट गावात शिवसेनेची सत्ता नसताना देखील आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गावातील विकास कामे मार्गी लावली जात आहेत. एसटी पिकअप शेडमुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.





