तांबुळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा मनसेतर्फे सत्कार…!

बांदा : गेले अनेक वर्षे तांबुळीसह असनिये गावातील ग्रामस्थांना डेगवे-तांबोळी येथे वनविभाग हद्दीत असलेल्या 80 मीटर रस्त्याचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे. या समस्येकडे सर्वपक्षीयांचे दुर्लक्ष झाल्याने सदर 80 मीटर रस्त्यासाठी एक चळवळच उभी करणार असल्याची ग्वाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस संदीप दळवी यांनी दिली.

तांबुळी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करताना दळवी बोलत होती. सदर रस्त्या संदर्भात बांदा माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे, मुंबई माजी नगरसेविका अनिषा माजगावकर, सावंतवाडी माजी संपर्क अध्यक्ष महेश परब, माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे, डिंगणे माजी शाखाप्रमुख नाना सावंत तसेच अँड. अनिल केसरकर, जय पटेकर, आशिष सुभेदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या समस्येकडे बांदा माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी आपल्या संदीप दळवी व गजानन राणे यांचे लक्ष वेधले. सावंत म्हणाले या मार्गे आमदार, मंत्री, खासदार प्रवास करतात मात्र 80 मीटर रस्त्याची समस्या काही त्यांना सुटत नाही किंवा ते सोयीस्कर दुर्लक्ष करतात. त्यामुळे सदर रस्त्यासाठी मनसेने उठाव करावा व नागरिकांची समस्या दूर करावी अशी मागणी मिलिंद सावंत यांनी पदाधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान, संदीप दळवी व गजानन राणे यांनी 80 मीटर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असे सांगितले. नाना सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.