प्रा. रमेश कासकर स्मृती कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

बांदा : मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरातर्फे आयोजित केलेल्या प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या लहान गटात आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने तर मोठ्या गटात मळगाव इंग्लिश हायस्कूलच्या भूमि एकनाथ नाटेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत जिल्ह्यातील ३२ हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. पाचवी ते सातवी या लहान गटात द्वितीय प्राची मदन मुरकर (आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल), तृतीय नैतीक नीलेश मोरजकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १, बांदा), उत्तेजनार्थ संपूर्णा सुधाकर राऊळ (मळगाव इंग्लिश स्कूल), सई स्वागत नाटेकर (कळसुळकर इंग्लिश स्कुल, सावंतवाडी) यांनी यश मिळविले. आठवी ते दहावी या मोठ्या गटात द्वितीय समृध्दी कृष्णा गवस (मळगाव इंग्लिश स्कूल), तृतीय स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर (न्यू इंग्लिश स्कुल, उभादांडा), उत्तेजनार्थ सुचिता राघोबा माळकर (मळेवाड पंचक्रोशी माध्यमिक हायस्कूल), काजल विलास दळवी (जनता विद्यालय, तळवडे) यांनी यश मिळविले.

परीक्षक म्हणून सौ. ललित प्रभाकर तेली, हनुमंत मालवणकर, अरविंद वालावलकर, बी. एस. राणे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, प्रणव कासकर, विजय निगुडकर, बी. एस. राणे, सचिव गुरुनाथ नार्वेकर नार्वेकर व परीक्षकांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज बांदेकर यांनी केले.