कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे जिल्हास्तरीय फेन्सिंग ( तलवारबाजी ) स्पर्धा यशस्वी पार पाडली. या स्पर्धेचे उद्घाटन विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे . कांबळे व कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्पर्धक तलवारबाजी स्पर्धेला उपस्थित होते.

या स्पर्धेची सर्व व्यवस्था क्रीडा संयोजक श्री. वणवे, श्री. पेडणेकर यांनी केली होती. नेटके नियोजन व शिस्त यामुळे तलवारबाजी स्पर्धा खेळाडूंचा मनाचा उत्साह वाढविणारी ठरली. उत्कृष्ट खेळाडू अजय शिंदे यांनी यावेळी उपस्थित राहून खेळाडूना शुभेच्छा दिल्या. तसेच कणकवलीचे तहसीलदार श्री. देशपांडे यांनी दुपारच्या सत्रात उपस्थित राहून तलवारबाजी खेळाविषयीची उत्सुकता समजून घेत सर्व स्पर्धकांच्या मनाच्या शक्तीची ऊर्जा वाढविणारे विचार मांडून खेळाडूना शुभेच्छा दिल्या. यावेळी सावळ सर परीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







