तुळस येथील दांपत्यास कारची धडक! ; जखमी अवस्थेत सावंतवाडी रुग्णालयात दाखल.

126

सावंतवाडी : कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती पत्नी गंभीर जखमी झाली. विजय होडावडेकर (वय ५४) व विनीता होडावडेकर (वय ५०, दोघेही रा. तुळस) अशी त्यांची नावे असून त्यांना स्थानिकांनी मळगाव येथे असलेल्या श्री नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिकेतून उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, धडक दिलेला कारचालक कुडाळच्या दिशेने पळून गेला असून याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे.