देवगड : देवगड – जामसंडे नगरपंचायतीसाठी कार्यान्वित असलेली पाणीपुरवठा योजना नूतनीकरण बळकटीकरण करण्यासाठी नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या अंदाजपत्रक सुमारे ७ कोटी ३१ लाख रुपये देवगड जामसंडे नगरपंचायतीला लवकरात लवकर निधी प्राप्त व्हावा. यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी घेतली व या कामासाठी लवकरात लवकर निधी प्राप्त व्हावा. अशा आशयाचे
मागणी पत्र यावेळी मंत्री पाटील यांना देण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात नगरपंचायत मध्ये येऊन सबंधित अधिकारी यांचे समवेत दहिबाव येथील अन्नपूर्णा पुरक नळयोजनेला भेट देऊन याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करू तसेच कोर्ले सातोंडी नळयोजना याची देखील पाहणी करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.
जलजीवन प्राधिकरण देवगडमधील अधिकारी यांना सूचना करून लवकरात लवकर प्रस्ताव सचिवांजवळ सादर करावा. सदर योजनेला निधी प्राप्त करून देण्याचा शब्द यावेळी मंत्री पाटील यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, नगरसेवक रोहन खेडेकर, संदेश पटेल, अमोल लोके आदी उपस्थित होते.





