अखेर सफाई कामगारांचे आंदोलन मागे..!

34

सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन गुरुवारी सायंकाळी अखेर मागे घेण्यात आले आहे. २ महिन्याचा तटलेला पगार संबंधित ठेकेदाराने दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी उशिरा जाहीर केले. याबाबत सावंतवाडीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दुजोरा दिला आहे.
दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराने दिले नसल्याने सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले होते. गुरुवारी सायंकाळी  उशीरा अखेर ते मागे घेण्यात आले