कणकवली : तलाठ्यांनी त्यांच्या सजांमध्ये उपस्थित राहावे, त्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करावे, या शासन निर्णयाची अंमलबजावणी कणकवली तालुक्यात तातडीने व्हावी, अन्यथा युवासेनेच्यावतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.
युवासेनेच्यावतीने सुशांत नाईक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी तलाठ्यांनी त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे निवेदन त्यांनी दिले.





