एटीएम कार्डचा वापर करून तीन लाख रुपये लंपास,खातेदाराची पोलीस ठाण्यात धाव..!

300

सावंतवाडी : सावंतवाडी माजगाव येथील एका व्यक्तीच्या एटीएमचा गैरवापर करून तब्बल तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.एटीएम धारक खातेदार एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेले असता एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तेथे असलेल्या एका व्यक्तीला आपले एटीएममधुन पैसे काढून द्यावेत अशी विनंती केली व पिन नंबर सांगितला.यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने त्यांना त्यांच्या एटीएम मधून पैसे काढून दिले खरे मात्र एटीएम कार्ड देत असताना त्यांनी दुसरेच एटीएम दिले आणि मुख्य एटीएम कार्ड आपल्याकडे ठेवले.यानंतर अज्ञात व्यक्तीने सदरचा एटीएम चा वापर करून वारंवार पैसे काढले.जेव्हा एटीएम कार्डने पुन्हा पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये गेले असता एटीएम कार्ड चालत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी सावंतवाडी स्टेट बँकेमध्ये विचारणा करून आपले पासबुक अपडेट करून घेतले असता त्यातून तब्बल तीन लाख रुपये एटीएम चा वापर करून काढल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.यावेळी त्यांच्याकडे असलेल्या एटीएम ची बँक अधिकाऱ्याने पाहणी केली असता सदरचे एटीएम फेक असल्याचे निष्पन्न झाल्याने आपले एटीएम चा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने सदरची रक्कम लंपास केल्याचे खातेदाराला समजून आल्याने अखेर त्याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.