सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत टेबल लंपास प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचे कर्मचारी ग्रामपंचायत मालकीचे टेबल गाडीत टाकून नेत असल्याचा संशय ग्रामस्थांना आल्याने ग्रामस्थांनी पाठलाग करत गाडी अडवली.यावेळी टेबल कुठे नेता?कोणी आणायला सांगितले? असे प्रश्न ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना केले.यानंतर ग्रामपंचायतचे सामान परस्पर इतरत्र नेत असल्याबाबतची लेखी तक्रार ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली.यानंतर पोलिसांनी सदर गावात जात वस्तुस्थिती जाणून घेतली.यावेळी ग्रामपंचायतचे टेबल चोरून देण्याचा उद्देश नसून उद्या गावात पाहणी करण्यासाठी समिती येणार असल्याने सदरचे टेबल इतर ठिकाणी नेण्यात येत असल्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.तसेच सदरचा प्रकार हा अनावधानाने घडल्याचे सांगत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त केल्याने तक्रारदार यांनी आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर या विषयावर पडदा पडला.





