सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील पारपोलि येथील एका व्यक्तीचे दीड लाख रुपये अज्ञात व्यक्तीने लंपास केले.सदरच्या व्यक्तीने सावंतवाडी पोस्ट कार्यालयातून दीड लाख रुपये आपल्या खात्यावरून काढले होते.यानंतर ते घरी जाण्यासाठी सावंतवाडी एस टी स्टँड आले.यावेळी पिशवीतील पैसे पाहिले असता त्यावेळी पिशवीत पैसे दिसून आले नाहीत.यानंतर सदर व्यक्तीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती .





