सावंतवाडी : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्यावतीने आयोजित वंदे मातरम् समूहगीत गायन आणि नृत्य स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या वयोगटात एकूण 7 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर आठवी ते दहावी या वयोगटात एकूण 8 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील समूहगीत गायन स्पर्धेत लहान गटात श्री जनता विद्यालय, तळवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर मोठ्या गटात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांकाचे मानकरी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सांगेली ठरले आहे.
तर गायन स्पर्धेत उत्कृष्ट शाळा म्हणून मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव ची निवड करण्यात आली.
तसेच नृत्य स्पर्धेत व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव यांनी पटकावला.
ही स्पर्धा सावंतवाडी येथील सार्वजनिक गणेश हॉल, सालईवाडा येथे पार पडली.





