सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील एका ग्रामपंचायतचे कर्मचारी गाडीने ग्रामपंचायत मालकीचे दोन टेबल इतरत्र नेत असल्याचे जागरूक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असता जागरूक ग्रामस्थांना संशय आल्याने ग्रामस्थांनी सदरची गाडी अडवली..यामुळे सदरचा प्रकार हा उघडकीस आला.
यावेळी गाडीत असलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी सदरची टेबल कुठे नेता? सदरचा प्रकाराबाबत जागरूक ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांना फोन करून विचारणा केली असता अशा कोणत्याही टेबलांचा लिलाव झालेला नसल्याची माहिती दिली.यामुळे ही दोन्ही टेबल नेमकी कुठे आणि कोणासाठी नेली जात होते हे अजून स्पष्ट झालेली नाही.खरोखर ही चोरी आहे की अन्य काही कारणास्तव टेबल नेली जात होती हे अजून समजू शकलेले नाही.
तसेच हे कोणाच्या सांगण्यावरून नेले जात होते हेही स्पष्ट झालेले नाही.सदरच्या प्रकाराबाबत पोलीस तक्रार करण्यासाठी ग्रामस्थ सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पाहणी करण्यासाठी तळवडे गावात मार्गस्थ झाले आहेत.सदरचे टेबल नेत असताना ग्रामपंचायतचे सीसीटीव्ही जाणून बुजून बंद केल्याचाही उल्लेख तक्रार मध्ये करण्यात आला आहे.





