जामसंडे येथे १८ रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन.

84

देवगड : दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:00 वा. कै.मोरेश्वर जनार्धन गोगटे, सांस्कृतिक भवन,जामसंडे येथे माजी आमदार ॲड.अजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली रानभाज्या महोत्सव आयोजित केला आहे.या रानभाज्या महोत्सवमध्ये रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व रोजच्या आहारात रानभाज्यांचा वापर याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या रानभाज्या महोत्सवामध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री तसेच रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.या प्रदर्शनामध्ये उमेद अभियान आणि माविम यांच्याकडील महिला बचतगटांचा समावेश असणार आहे.

तरी या प्रदर्शनास भेट देऊन औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा आपल्या रोजच्या आहारात वापर वाढावा याकरिता आपण व आपल्या परिवारास उपस्थित राहण्यासाठी कैलास ढेपे,  तालुका कृषी अधिकारी, देवगड यांनी आवाहन केले आहे.