सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील एका रेल्वे बुकींग सेंटरवर रेल्वे प्रशासनकडून धाड टाकण्यात आली आहे. सदरच्या रेल्वे बुकींग सेंटरमध्ये अवैधरीत्या तिकीट बुकींग केले जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनला मिळाल्याने सदरची धाड ही पडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदरची धाड टाकत असताना रेल्वे प्रशासन बरोबर कर्नाटक पोलीस अधिकारी, स्थानिक जिल्हा पोलीस आणि कर्मचारी उपस्थित आहेत. रेल्वे तिकिट बुकींगचा काळाबाजार होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. आता अशा प्रकारे तिकीट बुकींग करणाऱ्या इतर सेंटरवरही कारवाई होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र खरोखरच सदर रेल्वे बुकिंग सेंटरमध्ये अवैधरित्या तिकीट बुकींगचा काळा बाजार होत होता की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.




