कास ग्रामपंचायततर्फे स्वातंत्र्यदिनी विविध उपक्रम संपन्न.!

32

बांदा : कास ग्रामपंचायतमध्ये सरपंच प्रवीण पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत माजी सैनिक, माजी पोलीस कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विध्यार्थांचेही सत्कार करण्यात आले.

दरम्यान तंबाखूमुक्त व क्षयरोगमुक्त गाव आणि परिसर शपथही यावेळी घेण्यात आली। सुरुवातीला शालेय मुलांनी धून वाजून राष्ट्रगीत म्हणून स्फुर्ती गिते वाजवली. कार्यक्रमाला मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते